जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?

मुंबई | विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार देण्याच्या तयारीला लागला असून भाजपपुढे मात्र वेगळाच पेच निर्माण झाला आहे. सध्याच्या संख्याबळानूसार भाजप चार जागांवर निवडून येऊ शकतं, मात्र भाजपकडे सात नावं आहेत.

प्रस्थापित आणि विस्थापित असेही त्यामध्ये प्रकार आहेत. यापैकी भाजप नेमकी कुणाला संधी देणार हा प्रश्न आहे. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

भाजपच्या इच्छुकांमध्ये विधानसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे, तसेच भाजपचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा आहे, त्यांनी स्वतः आपण इच्छुक असल्याचं सांगितलं आहे.

याशिवाय नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि विधानसभेला तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे तसेच विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नावांची चर्चा आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि मुन्ना महाडिक यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी

-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

-“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”

-IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण

-दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी