बीड | विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलीये. परळी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण बहिण-भावामधलं असलेलं हाडवैर आणि मागच्या वेळी पंकजांनी केलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आतुर असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे…! म्हणून धनंजय मुंडेंनी बहिणीला शह देण्यासाठी आत्तापासूनच विधानसभेची तयारी सुरू केलीये.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. मतदारांशी ‘डोअर टू डोअर’ संवाद यात्रा सुरू केली आहे. मतदारसंघातील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात धनंजय मुंडेंनी पत्नी राजश्री यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परळी शहरातील प्रभागनिहाय महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघातील सामान्य महिलांना कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे? याचा आढावा त्या घेत आहेत.
मतदारसंघातील महिलांचे नेमके प्रश्न काय आहेत?? ते कशा पद्धतीने सोडवता येतील?? यावर राजश्री यांनी लक्ष केंद्रित केलंय.
नणंदेला हरवण्यासाठी आणि आपल्या पतीला जिंकवण्यासाठी भावजयीने कंबर कसली आहे. मागच्या वेळीसारखं पराभवाचं तोंड पाहायला लागू नये, म्हणून राजश्री या देखील जोरदार तयारीला लागल्या आहेत.
परळी विधानसभेची निवडणूक हायव्होल्टेज होणार आहे. लोकसभेप्रमाणे ही लढत एकतर्फी होणार की धनंजय मुंडे पंकजांना पराभूत करून इतिहास रचणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस
-राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!
-मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक
-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…
-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”