काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा पडलेला असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याधीही विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते, मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नव्हती.

आक्रमक नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद तसेच अनुभवी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाण्याची चर्चा रंगली आहे. सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. महसूल मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी त्यांना सांभाळावी लागत आहे.

दुसरीकडे अनुभवी असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सध्या कोणतंही मंत्रीपद नाही, कोरोना काळात त्यांनी केंद्र सरकार तसेच भाजपला आपल्या आरोपांनी सळो की पळो करुन सोडलं आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

-मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

-“संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या, सकाळी विका आणि आत्मनिर्भर व्हा”

-पडळकरांची पवारांवरील टीका आठवलेंनाही आवडली नाही, म्हणाले…

-यंदा गणेशाची मूर्ती किती फूट असावी?, मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय