मुंबई | अगदी छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरूवात करणारी अभिनेत्री म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला ओळखण्यात येतं. अनेकदा विद्यान आपल्या चित्रपटामधील भूमिकांबद्दल सार्वजनिक चर्चा केली आहे.
आपल्य वैशिष्ट्यपुर्ण अभिनयाच्या जोरावर बालननं बाॅलिवूडमध्ये स्वत:च एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती बाॅलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
इश्किया, द डर्टी पिक्चर, कहानी या चित्रपटांमध्ये विद्यानं तिच्या आयुष्याला वळण देणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. परिणामी तिला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली आहे.
द डर्टी पिक्चर बाबत विद्या बालननं अलिकडंच एक खुलासा केला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयानं या चित्रपटाच्या माध्यमातून विद्या बालन एक नव्या उंचीवर पोहोचली होती.
द डर्टी पिक्चरमध्ये विद्यानं सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अनेक स्तरातून विद्याच्या अभिनयाचं कौतूक झालं होतं.
ज्या क्षणी मी या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हाच माझ्या मनात ती कथा बसली आणि मी ती या चित्रपटामध्ये काम करण्याचं ठरवलं होतं, असा खुलासा विद्यानं केला आहे.
मी हा चित्रपट साईन केल्यानंतर अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं, असं विद्या म्हणाली आहे. अशा भूमिकांमुळं माझ्या प्रतिमेेला धक्का बसेल, असं अनेकांनी म्हटल्याचा खुलासा विद्यानं केला आहे.
आई-वडीलांनीही मला साथ दिली माझ्यापाठीशी ते उभे राहीले तुला जे करायचं ते कर असं त्यांनी सांगितल्याचं विद्या म्हणाली आहे. मी स्मिता सिल्कची भूमिका साकारण्यावर ठाम होते, असं विद्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, बाॅलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा एकता कपूरदेखील या प्रोजेक्टमध्ये सामिल होती. तिच्यात आणि विद्यामध्ये मैत्रीपुर्ण संबंध असल्याचं विद्या म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”
WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…
“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”
“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”
‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती