महत्त्वाची बातमी! विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई | राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. रूपाली चाकणकर यांच्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? यासंदर्भात चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या उपस्थितीमध्ये घोषणा करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाची नियुक्ती स्वीकारत असल्याचे सांगताना देशात महागाई सारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महिला वर्ग त्रासलेला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. पक्षाने मला संधी दिलेली आहे आणि जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन, असं विद्या चव्हाणांनी सांगितलं.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रवादीमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विद्या चव्हाणांनी म्हटलं आहे.

राज्यातील जिल्हा कमिट्या त्याच पद्धतीने राहणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीमध्ये विभागीय अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरचे विभागीय अध्यक्षपद शाहिम हकीम तर अमरावती विभागीय अध्यक्ष वर्षा निकम यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच पुणे विभागीय अध्यक्ष विशाली नागवडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनिता परदेशी तर औरंगाबाद शादिया शेख आणि लातूरचे वैशाली मोते यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, रूपाची चाकणकर यांच्याकडे  राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आहे. हे पद अर्धन्यायिक असल्याने राजकीय पद सोडण्याचा निर्णय रूपाली चाकणकर यांना घ्यावा लागला. 23 मार्च रोजी चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

 मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर 

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; हादरवणारा प्रकार समोर 

“मशिदीत पहाटेची अजान होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती थांबवू नका”