भाजपला मोठा धक्का; या नेत्याचा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. विजय घोडमारे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं कळतंय. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं समजतंय.

मुंबईमध्ये विजय घोडमारे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

घोडमारे हे 2009 मध्ये नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014मध्ये विजय घोडमारे यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळे घोडमारे नाराज होते.

2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट न मिळण्याची शक्यता असल्यामुळे विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणा मतदारसंघातून विजय घोडमारे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या-