“बहुमताची एवढीच खात्री आहे तर बॅलेट पेपरला का घाबरता?”

मुंबई | विधानसभा निवडणुकीत महायुती 229 जागा जिंकेल हा भाजपचा दावा फाजील आत्मविश्वास दर्शवणारा आहे. बहुमताची एवढीच खात्री आहे तर बॅलेट पेपरला का घाबरता? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

सर्व्हे मॅनेज करण्यात भाजपचा हातखंडा असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

निवडणुका आल्या की आपल्याला हवे तसे सर्व्हे भाजप करुन घेत असतं. पण अशा सर्व्हेची विश्वासार्हता किती असते हे मागील काही वर्षांत दिसून आलं आहे. काँग्रेसचा पराभव होईल, असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले याआधीचे अनेक सर्व्हे सपशेल खोटे ठरलेले आहेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

आम्हीच पुन्हा सत्तेवर येऊ असं चित्र निर्माण करून एकप्रकारे निवडणुकीचे निकाल प्रभावित करण्याचा हा प्रकार आहे. परंतु सर्व्हे करुनच निवडणुका जिंकता आल्या असत्या तर निवडणूक आयोगाची गरजच काय? भाजपचे आकडेच खरे मानून निकाल जाहिर करावेत, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-