नागपूर | राज्यात पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. याच पार्वश्वभूमीवर राज्य सरकारने करोनासंदर्भातील सर्व नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. अशातच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातील एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपायोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल हे आज सांगता येत नसलं तरा राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणार नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होत असून, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत विजय वडेट्टीवार यांनी एकप्रकारे सूचक इशारा दिला आहे.
मुंबई शहरातही कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळेच सरकारने अधिवेशनाचा कालावधी केवळ आठ दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सरु असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांंनी स्पष्ट केलं.
पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दी संदर्भात विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता, मुख्खमंत्र्यांनी सांगितलंय या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही. पोहरादेवीच्या गर्दीला जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलं, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान,नव्याने आढळून येणारा कोरोनाचा नविन स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांच्य फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक गोंधळून गेले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या छातीचा एक्स-रे काढला जात असून त्यामध्ये बदल झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोना रुग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, असा दावा वैद्यकीय तज्ञांनव्दारे केला जात आहे. आधी सुरुवातीला रुग्णांच्या फुफ्फुसात हळूहळू बदल झाल्याचा दिसून येत होता. परंतू आता फुफ्फुस लवकर खराब होत असल्याचं कोहिनूर रुग्णालयातील छातीरोग तज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; पाहा काय आहे भाव…
चिंताजनक! कोरोनामुळे शरिराच्या ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम
आज भारत बंदची हाक, कसं असेल स्वरुप? वाचा सविस्तर
वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चेत ‘या’ भाजप नेत्याला चपलेनं मा.रलं! पाहा व्हिडीओ
1 मार्चपासून शाळा बंद? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय