महाराष्ट्र मुंबई

विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकत भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना मला वारंवार पक्षप्रवेशसाठी फोन करत आहेत. वांद्र्यामधून मला आतापर्यंत 25 फोन आले आहेत, असा मोठा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एक विरोधी पक्षनेते भाजपात गेले म्हणून त्यांना दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत घ्यायचाय. मला वारंवार ते भेटण्यासाठी बोलावत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!

IMPIMP