मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहिर केली आहे. पण या कमिटीत विरोधी पक्ष नेते असलेल्या विजय वडेट्टीवार यांचंच नाव नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या समितीतच आपलं नाव नसल्याने काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते वड्डेटीवार नाराज असल्याचं कळतंय.
राज्यातल्या विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असं असताना काँग्रेस पक्षातला गोंधळ संपण्याची काही चिन्हे नाहीत. वडेट्टीवार हेच पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. महत्त्वाच्या समितीतच डावलण्याने ते नाराज आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निवड समिती माझं नाव नसल्यानं आश्चर्य वाटलं, यापूर्वी निवड समिती विरोधी पक्ष नेत्याचं नाव असायचं, पण यावेळी नाही. या समितीत माझं नाव नाही हे राजकारण आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
मला महाराष्ट्रातील मतदारसंघांची माहिती आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एका समितीची नियुक्ती जाहीर केली होती. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते के. सी. पडवी यांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सावरकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालणं आणि त्यांची विटंबना करणं निंदनीय”
-“ईडी सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी आहेत पण ते चौकशी करत नाहीत”
-पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीला जायला तयार- देवेंद्र फडणवीस
-मराठीत फलक दिसला पाहिजे….; राज ठाकरे यांची ईडीला नोटीस
-सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे- उद्धव ठाकरे