मुंबई | भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मतं फुटल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील आमदारांवरच कारवाई करण्याच्या केलेल्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे.
कॉंग्रेस पक्ष आता कारवाई तरी कोणावर करणार? कारवाई करायला या पक्षात माणसं तरी किती शिल्लक राहिली आहेत? आपल्या विचारांना आणि तत्वांना तिलांजली देवून काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाला होता, असं ते म्हणालेत.
राज्यात शिवसेनेचीही काँग्रेसपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेतृत्वावर विश्वास न राहिल्यानेच अनेकजण नेतृत्वापासून दूर चालले आहेत, असं विखे पाटील म्हणालेत.
55 आमदारांपैकी 40 आमदार एकावेळी निघून जातात. 12 खासदारही त्याच विचारात आहेत, आणखी किती माणसे दूर जातील याचा अंदाज शिवसेनेच्या नेतृत्वाला आता राहिलेला नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला.
आघाडी सरकारच्या काळात आधोगतीला गेलेले राज्य प्रगतीपथावर आणण्यासाठी हे सरकार काम करेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अनुभव आणि त्यांची कार्यक्षमता यामुळे राज्य निश्चितच पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर तसंच मतफुटीच्या मुद्द्यावर नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला झटका
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोाठी बातमी! शिंदे सरकारचा संजय राऊतांना पहिला दणका
“पवारसाहेब जागतिक नेते, मोठे नेते मग पवारांकडच जा, इथं कशाला अडकून पडलाय”