मुंबई | राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना भिकार सीरीयल न पाहण्याचं आव्हान केलंय.
विक्रम गोखले यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले.
प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी हे वक्तव्य केलंय. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी या व्याख्यानमालेत प्रेक्षकांना तिखट शब्दांत सुनावलं आहे.
प्रेक्षकांनी स्वताचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा! त्याच्यावर बंधने घाला.. आणि भिकार सीरीयल पाहणे बंद करा.. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सीरीयल नक्की पहा, असं ते म्हणाले.
आज कोणताही अर्थ नसलेल्या सीरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असल्याचं म्हणत त्याचं कौतुकही केलंय.
नागराज यांच्या शॉर्ट फिल्ममधून अतिशय विदारक सत्य चित्रित करण्यात आलं असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केलंय. तसंच आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असंही म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका”
“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य
भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर
सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं