सिनेविश्वातला जातीयवाद आताचा नाही… त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले

मुंबई | ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेने केलेल्या वक्तव्यानंतर कलाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

कलाविश्वात जातीयवाद आताचा नाही. फार वर्षांपासून या जातीयवादाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. ही खरंच चिंतेची बाब आहे. मात्र आपण काहीच करु शकत नाही, असं विक्रम गोखले म्हणाले.

सिनेसृष्टीमध्ये मी कधीही जातीयवाद अनुभवला नाही किंबहुना माझ्या सहकार्यांसोबतही असं झाल्याचं माझ्या लक्षात नाही, असंही विक्रम गोखले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विक्रम गोखले लवकरच ते ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून बोलतीये हे महाराष्ट्राने स्विकारायला हवं”

-मी बोलते ‘ते’ मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून- अमृता फडणवीस

-ट्रोलिंग झालं की मला रणांगणावर असल्यासारखं वाटतं- अमृता फडणवीस

-बजेट सादर करताना बऱ्याच त्रुटी होत्या- पृथ्वीराज चव्हाण

-धोनी इज बॅक…. चेन्नईच्या मैदानात लागोपाठ लगावले 5 गगनचुंबी षटकार!!! पाहा व्हीडिओ