सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही; विक्रम गोखले यांचं मत

मुंबई | खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे. स्वा. सावरकर वाङमय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिकांचं वितरण करताना ते बोलत होते.

स्वत:ला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणं सोपं आहे; पण असं म्हणणाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रेम केलं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नसल्याचं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक व्यक्ती पांढरा किंवा काळा नसतो. प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतातच. सावरकरांकडूनही चुका झाल्या असतील, तर त्यांच्या चुका स्वीकारा. पण कुणीही उठतो आणि लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करतो. हे अतिशय चुकीचं असल्याचं गोखले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदू समाज कधीही एकत्र येत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळेच 1400 वर्षे आपण गुलामगिरीत जगलो. हिंदुंनो देशावर खरं प्रेम असेल तर किंवा पुढच्या पिढीवर उपकार म्हणून तरी सर्व भेद विसरून एकत्र या, असं आवाहनही गोखले यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-

-“ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो”

-एक प्रवास कधीच न विसरता येणारा; अमोल कोल्हे झाले भावूक

-“सरकारकडे अर्थ नसला तरी शब्दरत्न बक्कळ आहेत; मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ”

-“आता वाटतंय, शेवटपर्यंत मौन धारण करावं; आण्णा हजारेंनी केल्या सरकार विरोधी भावना व्यक्त”

-विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी- सयाजी शिंदे