संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड

मुंबई : फलंदाजीचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांची हकालपट्टी करुन विक्रम राठोड यांची भारताच्या फलंदाजी पदाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. निवड समितीने तर राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षपदी भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी श्रीधर यांना कायम ठेवण्यात आले आहे.

एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने सपोर्ट स्टाफच्या विविध पदांसाठी शर्यतीत असलेल्या काही उमेदवारांची यादी आधी जाहीर केली. त्यातून उमेदवार जाहिर केले.

50 वर्षीय विक्रम राठोड यांनी 6 कसोटी आणि 7 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2016 मध्ये त्यांनी  राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणून संदीप पाटील यांच्यासह काम केले आहे. राठोड यांच्याकडे पुरेसा अनुभव आहे. त्यांच्या प्रशिक्षणावर आम्ही समाधानी असल्याचं बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी म्हणाले आहेत.

मुंबईचे माजी फिजिओ नितीन पटेल यांच्यावर भारतीय संघाचे फिजिओ ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंडचे ल्यूक वुडहाऊस यांच्यावर ट्रेनर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशसकीय अधिकारी म्हणून सुनिल सुब्रमण्यम यांना हटवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर

-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार

-भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर ‘वाडा’ची बंदीची कारवाई!

-बालाकोट हवाई हल्ल्याचा थरार पडद्यावर दिसणार!

-अमिताभ बच्चन यांचा दिलदारपणा; वयानं लहान असणाऱ्या ‘या’ स्पर्धकाच्या पडले पाया