आमदार धीरज विलासराव देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर; खते बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ

लातूर | खरीप हंगामासाठी बळीराजा सज्ज झाला असून खरीपाच्या पूर्वतयारीला सुरवात झाली आहे. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावरून बियाणे, खते आणि किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. तसेच सामाजिक अंतर न पाळले गेल्यास कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची भीती आहे.

महाविकास आघाडी सरकार शेतकरी हा केंद्र बिंदू मानून वाटचाल करत आहे. देशातील आर्थिक मंदी आणि नंतर आलेला कोरोना आजार यामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. अशावेळी खरीप हंगाम 2020-21 कडे शेतकरी मोठ्या आशेने पाहत आहे, असं लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सरकारने थेट बांधावरती खते आणि बियाणे योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ करून लातूर तालुक्यातील नागझरी येथील 22 शेतकऱ्यांना 195 चे खताचे प्रत्यक्षात वाटप आणि बियाणे वाटपाचं नियोजन बांधावर जाऊन धिरज विलासराव देशमुख यांनी केलं आहे.

सुदैवाने आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये हा आजार पसरला नाही यापुढे देखील अशाच पद्धतीने सजग राहून महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपल्या परिवाराची आणि गावाची काळजी घ्यावी, असं आवाहन धीरज देशमुख यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता?; राहुल गांधी म्हणतात…

-‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

-टोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका!

-कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण

-आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…