राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे

मुंबई |  राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पवारांची साथ सोडून हाती भाजप-सेनेचा झेंडा घेत आहेत. यावरच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: जबाबदार आहेत. या वयात होत असलेल्या कष्टामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुख:च होईल, असं मेटे म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीतून खूप मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग झाली. जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत तर सचिन अहिर, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदिप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

मेटेंचा शिवसंग्राम पक्ष सध्या महायुतीसोबत आहे. युतीकडे त्यांनी आगामी विधानसभेला 12 जागांची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीने अनोखी शक्कल लढवत कार्यकर्त्यांना शेवटचा श्वास असेपर्यंत पवारांसोबतच राहण्यासाठी शपथ दिली आहे. तर शपथ देऊन तरी कार्यकर्ते थांबतील का? असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

-विधानसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंनी खास प्लॅन आखला! यशस्वी होणार??

-भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!

-मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक