एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | गेला महिनाभर रखडलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. गेले अनेक दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या दिल्लीची वारी फळाला आली आहे.

आज शिंदे गटातील नऊ आणि देवेद्र फडणवीस यांच्या भाजप गटातील नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे. त्तपूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी एक वक्तव्य केले आहे. गेल्या महिनाभरापासून मंत्रालय हे सचिवालय झाले आहे, आज तरी ते मंत्रालय व्हावे, असे राऊत म्हणाले.

ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळेल त्यांना ते लखलाभ लाभो तसेच 40 आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमच्यापासून पळविले आहे. पण आता त्यांच्यापैकी 8 – 10 जणांना मंत्रिपदे मिळणार आहेत.

तसेच उरलेले इतर जण आता एकमेकाच्या उरावर बसायला मोकळे झाले आहेत. त्यामुळे आता पाय खेचणे सुरु झाले आहे. काही लोक आमच्या संपर्कात येण्यास देखील सुरुवात झाली आहे, असे राऊत म्हणाले.

शिंदे यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार आता पुन्हा आमच्या संपर्कात आल्याचे विनायक राऊत यांचे म्हणने आहे. त्यामुळे आता शिंदे गटात मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आमदार आमच्या संपर्कात असले तरी त्यांना आम्ही आमच्यात येण्यास कोणताही दबाव टाकला नाही आहे किंवा आम्ही त्यांना कोणतेही आमिष दाखविले नाही आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

या सरकारला भविष्य नाही, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) अपात्रतेसंदर्भात जो खटला प्रलंबित आहे. त्यात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. देशातील सर्व कायदेतज्ज्ञ देखील तेच सांगत आहेत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं

टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार

उद्या मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

“उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही”