“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सचिच्छा भेट घ्यायला गेलो होतो. यावेळी पंतप्रधानांनी आता उद्धव ठाकरेंची तब्बेत कशी आहे, असं मोदींनी विचारल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं आहे.

आज ते विधानसभेत जाणार आहे का अशा प्रकारची आपुलकीने त्यांनी विचारपूस केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या तब्येतीवरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना खासदार विनायक राऊत चांगलंच सुनावलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या विचारांची जी उंची आहे ती महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये कधी येणं शक्यच नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो. नमस्कार केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची तब्येत कशी आहे? आज ते विधानसभेत जाणार आहेत का? अशी आपुलकीने चौकशी केली. आम्ही त्यांना माहिती दिली आणि पुढे गेलो, असं विनायक राऊत म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांची जी उंची आहे ती महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये कधी येणं शक्यच नाही. आजही उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं त्यांना कळणार नाही. राज्य आणि देशाच्या विकासासाठी दोघांमध्ये चांगलं नातं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, नागपुरात हे अधिवेशन होत होतं, पण यावेळी कोरोना आणि मुख्यमंत्री कारणाने मुंबईतच हे अधिवेशन घेण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले 

पेपरफुटीच्या चौकशीसाठी वेळ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले… 

“उद्धव ठाकरेंनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा” 

पेपर फुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; राजकीय कनेक्शनमुळं खळबळ 

“उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यावा”