“चांगला माणूस कसा बिघडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रकांत पाटील”

मुंबई | राज्यातील नगरपंचायतींचा निकाल आता जाहीर झाला आहे. राज्यातील तब्बल 100 हून अधिक नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. त्यांनतर आता राज्यात राजकीय वाद पेटला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राज्यातील शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य विधानसभेचं हिवाळी अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून पाटील यांनी शिवसेनेला घेरलं होतं.

शिवसेने खासदार विनायक राऊत यांनी पाटील यांना घेरण्याचं काम आता केलं आहे. राऊत यांनी निवडणुकीच्या निकालावरून भाजपवर आणि पाटील यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील हे चांगला माणूस कसा बिघडतो यांच उत्तम उदाहरण आहेत. सत्ता मिळत नाहीये म्हणून ते सैरभैर झाले आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. कोरोना काळात चांगलं काम त्यांनी केलं आहे. भाजपनं उगाच आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं राऊत म्हणाले आहेत.

अतिशहाणपणाचा सल्ला भारतीय जनता पक्षाचे लोक देत आहेत. तो सल्ला देण्याची गरज नाही. आमचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा आम्हाला आनंद आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

कोकणाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा असणारे विनायक राऊत यांनी भाजपवर आरक्षणावरून देखील टीका केली आहे. ओबीसींना फसवण्याचं काम भाजपनं केल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात नगरपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर राहिल्यानं आणि महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा शिवसेनेला मिळाल्यानं राज्यात जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!

टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज

 बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी