Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”

narayan

मुंबई | राज्याच्या राजकारणात कोकणातील राजकारणाला खूप महत्त्वाचं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. कोकणातील ही राजकीय लढाई वर्चस्वासाठी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कधीकाळी शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांमध्ये असणारे नारायण राणे काॅंग्रेसच्या मार्गे भाजपात दाखल झाले आहेत. परिणामी सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढत आहे.

नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान राणे यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भर सभेत दिलं आहे.

नारायण राणेंनी हिंमत असेल तर कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपोजीट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणार नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

दोनदा नारायण राणेंच्या मुलाचा पराभव झाला आहे. एकदा त्यांचा झाला आहे. राणेंसारख्या गद्दारांची डाळ सिंधुदुर्गमध्ये शिजू देणार नाही, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

कोकणाच्या विकासात राणेंचं काहीच योगदान नाही म्हणून तर त्यांना कोकणवासियांनी पराभूत केलं आहे. नारायण राणे यांच्यावर विनायक राऊत यांनी जहरी टीका केली आहे.

राणे आणि राऊत यांच्यातील वाद काही केल्या शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. आजच नाही तर भविष्यत कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना राऊत यानी केली आहे.

कुडाळ मालवण, सिंधुदुर्ग या मतदारसंघात राणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नारायण राणे यांच्यावरील टीकेला नितेश राणे आणि निलेश राणे काय उत्तर देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

येत्या काळात राणे आणि राऊत यांच्यातील हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पावरूनही या नेत्यांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार वाद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट

“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?” 

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?” 

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार