उद्धव ठाकरेंचा कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका बंडखोर आमदारांची हकालपट्टी

मुंबई | शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस वाढतंच आहे.

आमदारांनंतर नगसेवकांनीही बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडाळीनंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

उद्धव ठाकरेंनी एकापाठोपाठ एक कारवाईचा सपाटा लावला असून आणखी एका बंडखोर आमदाराची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शाह यांची देखील उचलबांगडी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ते समर्थक आमदारांसोबत सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. यानंतर बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून मिलींद नार्वेकरांसोबत रवींद्र फाटकही सुरतला गेले होते.

रवींद्र फाटक यांनी सुरत येथे जाऊन एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रवींद्र फाटक देखील शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाऊन बसले.

दरम्यान, रवींद्र फाटक हे ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण त्यांनी बंडखोरी करत शिंदे गटात गेल्याने शिवसेनेने त्यांची जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शनिवार-रविवार फिरायला बाहेर पडताय?, पुणेकरांनो या गोष्टीमुळे वाढेल तुमची डोकेदुखी!

हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्याला धोक्याचा इशारा; पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

“माझा राजीनामा माझ्या खिशात, दबावाखाली काम करणार नाही”; ‘या’ नेत्याचा मोदींना इशारा 

जिओच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; जिओकडून नव्या धमाकेदार प्लॅनची घोषणा 

‘पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल…’; शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला