खेळ

विनेश फोगटनं रचला इतिहास; कुस्तीत गोल्ड मिळवणारी पहिलीच भारतीय महिला

इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये विनेश फोगटने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या कुस्तीमध्ये तिने भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

विनेश फोगट हिने जपानच्या प्रतिस्पर्धीवर 6-2 अशी मात करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. विनेश ही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे.

हे भारतासाठीचे या आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी रविवारी बजरंग पूनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

विनेशच्या या कामगिरीचं चांगलंच कौतुक होतं. सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला, हरयाणा सरकारने ३ कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. 

IMPIMP