“पक्षाच्या ध्वजावर राजमुद्रेचा वापर करणं गैरकृत्य आहे”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेने आपल्या पक्षाचा जुना ध्वज बदलला आहे आणि छ. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाचा नव्या ध्वजाचं अनावरण केलं आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील यांनी मनसेच्या नव्या ध्वजावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी  मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे.

पक्षाच्या ध्वजावर राजमुद्रेचा वापर करणं म्हणजे गैरकृत्य आहे. एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका कोणत्या पक्षाला पटली नाही तर त्या राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन होतात. त्यावेळी पक्षाचे ध्वज जाळले जातात. त्यामुळे महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान झालेला आम्हाला चालणार नसल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या काळात उत्साही कार्यकर्ते सगळीकडे ध्वज लावतात. नंतर ते झेंडे निवडणूक अधिकाऱ्यांकडून उतरुन डंम्पिंग ग्राऊंडला जातात. त्यामुळे आमचा मनसेच्या ध्वजाला विरोध असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पाटील यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली आहे. राजमुद्रा असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याला मान्यता देऊ नये, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-