कोलकाता | पोलीस आणि प्रशासनाने परवानगी नाकारुन देखील पश्चिम बंगालमध्ये नबाना अभियान (Nabanna Abhiyan) रॅलीचे आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे. यावेळी मोठा हिंसाचार उसळला.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना कोलकातात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा मोर्चा अडविला देखील, पण कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालत पोलिसांना लाठीमार करण्यास प्रवृत्त केले.
हजारो कार्यकर्त्ये अनेक जिल्ह्यात आणि शहरांमध्ये अटक केले आहेत. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना देखील अटक करण्यात आली आहे. बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari), लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) , तापसी मंडोल (Tapsi Mandol) आणि दिबांकर घरामी (Dibankar Gharami) यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हलदिया आणि नंदिग्राम या भागात पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची वाहने अडविली. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा नबाना येथील सचिवालयावर मोर्चा घेऊन धडकण्याचा डाव होता.
सतरागंची येथून अधिकारी मोर्चाचे नेतृत्व करत होते. तर दुसरीकडे पक्षाध्यक्ष सुकांता मुजूमदार (Sukanta Mujumdar) यांनी हावरा मैदानातून नेतृत्व केले. माजी पक्षाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी कॉलेज रस्त्यापासून मोर्चाचे नेतृत्व केले.
बंगाल पोलिसांना विविध भागांतून येणाऱ्या या मोर्चांचे योग्य नियोजन करुन त्यांचा मार्ग यशस्वीपणे अडविला. सुवेंदू अधिकारी यांनी याप्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जबाबदार धरले आहे.
ममता बॅनर्जींचे पोलीस लोकशाही मार्गाने आंदोलन आणि निदर्शन करणाऱ्या लोकांना पायदळी तुडवत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाच्या वतीने अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी केला.
पोलिसांना जमावाला रोखण्यासाठी बॅरिकेड, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला. यावर देखील अधिकारी यांनी टीका केली आहे. बॅरिकेड हे तृणमूल काँग्रेसच्या चिंता आणि भित्रेपणाची निशाणी आहे, असे अधिकारी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही या अजित पवारांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर
“नरेंद्र मोदींनंतर भाजप सोनिया गांधी यांना…”; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
“…तर हा आशिष शेलार सुद्धा कुरेशी”; आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल