कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

नवी दिल्ली | इंटरनेटमुळे आज संपूर्ण जग जवळ आलं आहे. इंटरनेटमुळे जगभरातील अनेक गोष्टी आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतात. काहीवेळा तर सोशल मिडीयावरील अनेक मजेशीर गोष्टी लोकांना लोटपोट करुन सोडतात.

सोशल मिडीयावर अनेकदा वन्य किंवा पाळीव प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. मग यामध्ये बोलणारा कोंबडा असेल किंवा वासरासाठी धावणारी गाई असेल. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक गाई चक्क रस्त्यावरंच कॅटवॉक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ विदेशातील असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून लोकांचं मनोरंजन होत असल्याने नेटकरी याला चांगलीच पसंती दर्शवत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, रस्त्यावरुन गाईंचा कळप चालला आहे. या कळपातील पांढऱ्या आणि तपकिरी रंगाची एक गाई रस्त्याच्या मध्याभागून चालत आहे. रस्त्यावरुन चालणाऱ्या या गाईकडे पाहिल्यानंतर ही गाई चक्क कॅटवॉक करत चालत असल्याचा भास होत आहे.

या व्हिडीओमाध्ये पाठीमागे अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे. तसेच कॅटवॉक करणाऱ्या गाईच्या पाठीमागे इतरही काही गाई चालत येताना दिसत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या गाईचं काैतुक सर्वच स्तरातून होत आहे.

कॅटवॉक करणाऱ्या या गाईचा व्हिडिओ 2018 पासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यापूर्वीच या गाईविषयी सोशल मिडीयावर खूप चर्चा झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्वीट केला आणि पु्न्हा एकदा तो खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी या गाईला दुखापत झाली असावी, असं मत व्यक्त केलं आहे.  तर काही लोक ही गाई विनोदबुद्धी असलेली गाई असल्याचं म्हटलं आहेत. हा व्हिडीओ खूप जुणा आहे. मात्र, सर्वांचं मन मोहून टाकणाऱ्या या गाईचा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा.

महत्वाच्या बातम्या-

‘मला डुक्कराच्या बड्डेला जायचंय’; चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! वीज बिलासंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले….

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा”

“ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना”

‘या’ भाजप खासदाराचं कोरोनामुळं निधन

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy