Viral Video | चित्तोडगड जिल्ह्यातील सालेरा गावातील एका शाळेत एक शिक्षक आणि एक शिक्षिका आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. शाळेच्या कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे अश्लील कृत्य कैद झाले होते, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी दोघांनाही बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
शाळेच्या कार्यालयातच चाळे-
ही घटना जिल्ह्यातील गंगार ब्लॉकमध्ये घडली, जिथे एक शिक्षक आणि एक शिक्षिका शाळेच्या कार्यालयात (Viral Video) अश्लील कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाले. धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनीही हे कृत्य पाहिले आणि घरी जाऊन त्यांच्या पालकांना सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी शनिवारी पोलिस स्टेशन प्रभारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि दोघांनाही निलंबित करण्याची मागणी केली.
औषध घेतलं आणि… ‘या’ सुुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला मृत्यूने गाठलं!–
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर दिवशी नेमकं काय घडलं?, धक्कादायक खुलासा समोर!-
मुख्याध्यापकावर गंभीर आरोप
निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक सतत त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत होते. जेव्हा कोणी याचा विरोध केला तेव्हा ते गावकऱ्यांना धमकावत असत की ते त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करतील. ते दररोज शाळेत अश्लील कृत्य करत असत. ते इतर शिक्षकांना आणि गावकऱ्यांना रिव्हॉल्व्हरने मारण्याची धमकी देत असत. ऑफिसमध्ये गैरकृत्ये (Viral Video) केल्यानंतर, ते शाळेतील मुलींकडून ती जागा स्वच्छ करून घेत असत.
सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीस
सीएमसी सदस्य आणि पालकांनीही मुख्याध्यापकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे गावकरी प्रत्येक वेळी गप्प राहिले. अखेर, गावकऱ्यांनी स्वखर्चाने पैसे गोळा करून शाळेच्या कार्यालयात एक छुपा कॅमेरा बसवला.
मुख्याध्यापकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एक घंटा लावली होती आणि ज्याला कार्यालयात जायचे असेल त्याने प्रथम घंटा वाजवून त्यांना कळवावे, असे सांगण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, शाळेच्या पवित्र वातावरणाला काळिमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.