कोरोना लढ्यात आता विराट-अनुष्काचा पुढाकार, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मुंबई| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेकजण पुढे येऊन मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.

यातच अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच आपला 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानत अनुष्कानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आभार व्यक्त केल्यानंतर अनुष्कानं ती आणि विराट कोरोनाविरूद्धच्या लढ्यात नवीन मोहीम सुरू करणार आहेत. याविषयी माहितीही दिली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्काने म्हटलं की, ‘मला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित आहात. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. तुम्ही माझा दिवस खरोखर खास बनवला पण अशा कठीण काळात माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटले नाही. पण मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छित आहे.’

पुढे अनुष्का म्हणाली की, ‘मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की ही वेळ एकत्र येण्याची आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्यासाठी आहे. मला सांगायचे आहे की, मी आणि विराट एकत्र प्रयत्न करीत आहोत आणि कोरोनाविरूद्धच्या या लढाईत लवकरच तुमच्याबरोबर उभे राहणार आहोत. मी लवकरच आपल्याशी संबंधित सर्व माहिती शेअर करेन, तोपर्यंत घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या.’

या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

कोरोनातून बरं झाल्यानंतर आजीने डॉक्टरांना मारली मिठी, पाहा…

कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद…

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

जाणून घ्या!कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करताना, वजन कमी…