इस्लामाबाद | पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियाँदाद यांनी भारतीय कर्णधाराच्या खेळाचं कौतुक केलं आहे. विराट कोहली हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहणं एकाप्रकारे पर्वणीच असते, अशा शब्दांत जावेद मियाँदाद यांने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.
विराट कोणत्याही खेळपट्ट्यांवर शतकं झळकावतो. जलदगती, फिरकी अशा सर्व प्रकारच्या गोलंदाजीचा तो चांगल्या पद्धतीने सामना करतो. बाऊंसर चेंडू खेळण्याचं त्याचं कौशल्यही चांगलंच आहे. त्याचे काही फटके हे खरंच पाहण्यासारखे असतात, असं जावेद मियाँदादने म्हटलं आहे.
विराट इतर खेळाडूंसारखा दोन धावा काढल्यानंतर नौटंकी करत नाही. क्रिकेटप्रती त्याला आदर आहे, असं मियाँदाद याने आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलताना सांगितलं.
दरम्यान, सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे क्रिकेट ठप्प झालेलं आहे. बीसीसीआयने भारतामधील महत्वाच्या स्पर्धा काही काळापुरत्या रद्द केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
-कोरोनाची लागण झाली कनिकाला, पण चिंता वाढली नेतेमंडळींची!
-पार्थ पवार सिंगापूरहून आले का?; अजित पवारांचं ‘दादा’ शैलीत उत्तर!
-राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करा- देवेंद्र फडणवीस
-मी पण घरी आहे, तुम्ही पण घराबाहेर पडू नका- इंदोरीकर महाराज