खेळ

रोहित शर्मा बरोबरच्या वादावर विराट कोहलीचा मोठा खुलासा!

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने रोहित सोबतच्या वादावर भाष्य केलं. 

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरवात झाली. त्यानंतर रोहितने विराटची पत्नी अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यावर रोहित सोबत कुठलाही वाद नसल्याचं सांगत कोहलीनं रोहित सोबतच्या असणाऱ्या वादाला पूर्णविराम दिला आहे.

ड्रेसिंग रुमचं वातावरणं जर चांगलं नसतं तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरी चांगली झाली नसती. त्यामुळे अशा चर्चा होणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊन बघा, असंही यावेळी विराट म्हणाला.

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत 3 टी-ट्वेन्टी,  3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-ट्वेन्टी मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारे पहिले 2 टी- ट्वेन्टी सामने हे अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे खेळण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आता 11 वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशीप’चा धडा!

-चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली!

-एकदिवसीय विश्वचषकानंतर आता थरार कसोटी विश्वचषकाचा! आयसीसीने केलं वेळापत्रक जाहीर

-भाजपा प्रवेश देणे आहे पण नियम व अटी लागू…; ‘पुणेरी स्टाईल पोस्टर’बाजी!

-इम्तियाज जलील यांची विजयी रॅली; संसदेत दुष्काळावर भाषण अन् रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

IMPIMP