विराट कोहलीलाही लागलं पुष्पाचं वेड, पाहा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

मुंबई | एखादा चित्रपट रिलीज झाल्यावर बऱ्याच दिवस त्या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळते. असंच काहीसं सध्या ‘पुष्पा’ चित्रपटाविषयी पहाया मिळत आहे.

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मीका मंधाना यांचा ‘पुष्पा’ चित्रपट चांगलाच हिट ठरत आहे. सोशल मीडियावरही सध्या पुष्पाची क्रेझ पहायला मिळत आहे.

पुष्पा चित्रपटातील गाण्यांनी आणि हटके स्टाईलनं सध्या सगळ्यांनाच वेड लावलं आहे. अशातच सोशल मीडियावर पुष्पा फीवर चढल्याचं पहायला मिळत आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विराटलाही पुष्पाचं वेड लागल्याचं पहायला मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विराट श्रीवल्ली गाण्यावरची स्टेप करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे.

भारतीय संघाला विकेटची गरज असतानाच कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात झेल घेतला. डीप मिड-विकेटमध्ये शानदार झेल घेतल्यानंतर कोहलीनं पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप्स केल्या. तेव्हाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पुष्पा या चित्रपटातील रश्मीका आणि अल्लू अर्जुन यांची जोडी सर्व प्रेक्षकांना आवडल्याचं दिसत आहे. याशिवाय या चित्रपटातील अॅक्शन, हटके स्टाईल, गाणी, भन्नाट अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  S.T Strike: एसटी संपाविषयी महत्त्वाची बातमी आली समोर

  काँग्रेस आमदाराच्या मुलीचा हॉट आणि बोल्ड अंदाज, पाहा फोटो

  कोरोना लसीकरणाविषयी महत्त्वाची माहिती आली समोर, तज्ज्ञ म्हणाले..

  भाजपचा पुणे शहराध्यक्ष फोन उचलेना, भाजप नेत्याचा मदतीसाठी मनसे नेत्याला फोन

  “बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत बसलेत”