Top news खेळ देश

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास

नवी दिल्ली | सध्या चालू असलेल्या आयपीएलच्या 13 व्या पर्वात रोज नवनवीन विक्रम पाहायला मिळत आहेत. नुकतंच काल आयपीएल मधील 31वा सामना पार पडला.

हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधार विराट कोहली याच्यासाठी खूपच खास ठरला आहे. या सामन्यात विराट कोहली याने एक नाही तर दोन-दोन विक्रम केले आहेत.

पहिला म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी विराट कोहली याने 200वा सामना खेळला आहे. हा सामना त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करायला आला तेव्हा काही वेळातच त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचाही विक्रम मोडीत काढला आहे.

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार ठरला आहे. विराट कोहली याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध ज्यावेळी 10 धावा केल्या त्याच वेळी तो इतिहासातील आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार बनला आहे. धावांच्या बाबतीत त्याने महेंद्र सिंह धोनी यालाही मागे टाकले आहे.

महेंद्र सिंह धोनी याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये 4275 धावा केल्या आहेत. पण आता विराट कोहली आता त्याच्याही पुढे निघून गेला आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातच आता महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार गौतम गंभीर आहेत, ज्यांनी दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने कर्णधार असताना 3518 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.

विराट यानं आरसीबीसाठी 15 सामने चॅम्पियन लीग टी 20मध्ये खेळले आहे. अजून कोणत्याच खेळाडूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी एवढे सामने खेळले नाही.

या आयपीएल पर्वात विराट कोहली याने चौकार मारण्याच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. विराट कोहली याने 183 सामन्यांमध्ये 493 चौकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!