Top news खेळ

प्रतिक्षा कायम! विराट एकटा झुंजला पण शतक करण्यात अपयशी

virat kohali e1641915836922
Photo Credit - Twitter/ ICC

मुंबई | भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि सर्वकालिन महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली सध्या आपल्या शतकापासून तब्बल दोन वर्षाहून अधिक काळापासून लांब आहे.

विराट कोहली सध्याच्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिन तेंडूलकरच्या सर्वाधिक 100 शतकांचा विक्रम मोडू शकणारा सध्यातरी विराट हा एकमेव खेळाडू आहे.

विराट कोहली सध्या चालू असणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत चांगल्या फाॅर्ममध्ये दिसत आहे. विराट तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या चांगल्या खेळीला शतकात रूपांतरित करण्यात परत एकदा अपयशी ठरला आहे.

विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकांची नोंद आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये विराटनं तब्बल 43 शतकं लगावली आहेत. परिणामी त्याच्याकडून सचिनच्या विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे.

विराट कोहली आज तीसऱ्या कसोटीमध्ये प्रचंड संयमानं खेळताना पहायला मिळाला आहे. विराटनं पहिल्या कसोटीत बाद होताना ज्या प्रकारे मध्ये येणाऱ्या चेंडूवर खेळण्याचा मोह केला तो या कसोटीत केला नाही.

एका बाजूनं एक-एक गडी बाद होत असताना विराट एकटा खंबीरपणे खेळपट्टीवर उभा होता. त्याची खेळी पाहून भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडच्या खेळीची प्रत्येकाला आठवण झाली असेल.

विराट खूप संयमानं खेळत होता पण पुढील बाजून गडी बाद होत गेल्यानं त्याचा संयम तुटला आणि तो 79 धावांवर बाद झाला. विराट पुन्हा आपल्या अर्धशतकाचं शतकात रूपांतर करण्यात अपयशी ठरला आहे.

तब्बल 761 दिवस आणि 61 अंतरराष्ट्रीय डावानंतरदेखील विराटची शतकाची पाटी कोरीच राहीली आहे. विराटला या कसोटीत शतक साजर करून आपल्या मुलीला पहिल्या वाढदिवसाची सुंदर भेट देण्याची संधी गमवावी लागली आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या शतकाची भारतीय क्रिकेटला अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. सध्या चालू असणाऱ्या कसोटी मालिकेत के.एल राहुल एकमेव शतक करणारा फलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के; आता ‘इतक्या’ आमदारांनी दिला राजीनामा

 पर्यटनस्थळांबाबत मोठा निर्णय, फिरायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद