Top news खेळ देश

विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला विचारला ‘तो’ प्रश्न; प्रेक्षक झाले हैराण!

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या गर्भावस्थेविषयी बरीच चर्चेत आहे. आजकाल ती तिचा पती आणि क्रिकेटपटू विराट कोहली सोबत दुबईमध्ये आहे. आयपीएलमध्ये ती विराटला प्रोत्साहन देत आहे.

हे दोघेही एकमेकांची चांगलीच काळजी घेत आहेत. खेळादरम्यानसुद्धा विराट कोहली आपल्या गर्भवती पत्नीबद्दल चिंता करत आहे. या दोघांचा एक गोंडस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का कायमच मॅच बघण्यासाठी आणि आरसीबीला चिअर अप करण्यासाठी स्टेडिअमवर पोहोचते. अनुष्का आणि विराटचा स्टेडिअमवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे दोघं एकमेकांना इशारा करताना दिसत आहेत.

विराट मैदानावरुन इशारे करत अनुष्का शर्माला रात्रीचे जेवण करण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यादरम्यानचा आहे. विराटच्या प्रश्नाचे उत्तर अनुष्काने हसत हसत अंगठ्याने दिले. ज्यानंतर विराट हसण्यास सुरुवात करतो.

विराट अनुष्काची घेत असलेली काळजी अतिशय चर्चेचा विषय आहे. चाहत्यांना देखील ही गोष्ट खूप छान वाटत आहे. दोघांचाही चाहतावर्ग विराटचं कौतुक करत आहेत. अनेकजण त्याला परफेक्ट पती म्हणत आहेत. सामन्यादरम्यान विराटने अनुष्काची घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे.

हि गोष्ट पाहता पुन्हा एकदा ही जोडी मोस्ट हॅप्पी सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत अग्रस्थानी येते हेच स्षष्ट होत आहे. अनुष्का शर्मा अखेर 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटात शाहरुख खान आणि कटरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर आत्तापर्यंत अनुष्का शर्माचा एकाही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अनुष्काने ‘अमेझॉन प्राइम’ची वेब मालिका ‘पाताल लोक’ आणि नेटफ्लिक्सची ‘बुलबुल’ यात काम केलं आहे.

दरम्यान, मैदानावरील विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील खास आणि तितक्याच रोमँटीक क्षण क्रिकेटपटू एबी डिविलियर्स यानं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!

पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…

मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ