Virat Kohli Replacement l कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूची एंट्री!

Virat Kohli Replacement l बीसीसीआयने 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याला स्थान दिले आहे. (Virat Kohli Replacement)

पहिल्या दोन कसोटीत विराट खेळणार नाही :

विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून विराटच्या जागी कोणत्या खेळाडूंना संधी मिळ्णार याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र विराट कोहलीची जागा घेण्याच्या शर्यतीत सरफराज खानचे देखील नाव होते. मात्र सर्फराज खान सध्या भारत A संघाशी संबंधित राहील.

रजत पाटीदार पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी हैदराबाद येथे होणाऱ्या टीम इंडिया या संघात सामील झाला आहे.तसेच रजत पाटीदारला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला आणि त्याला सर्फराज खानऐवजी टीम इंडियाचे तिकीट मिळाले. भारत अ संघाकडून खेळताना रजत पाटीदारने इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 धावांची खेळी केली होती. तर गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रजत पाटीदारने भारत अ संघाकडून 111 धावांची खेळी केली होती. त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे रजत पाटीदारला टीम इंडियात एंट्री मिळाली आहे. (Virat Kohli Replacement)

Virat Kohli Replacement l अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी नाही :

विराट कोहलीच्या जागी चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळू शकते असा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात होता. मात्र पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवला असून अलीकडेच त्याने द्विशतक झळकावले आहे. पण आता पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

तर अजिंक्य रहाणेला रणजी ट्रॉफीमध्येही चमत्कार करता आलेला नाही. त्यामुळे त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसारख्या युवा खेळाडूंवरच विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, या दोन खेळाडूंना या मालिकेत कामगिरी करता आली नाही, तर त्यांना संघातील स्थान टिकवणे फार कठीण जाईल.

News Title : Virat Kohli Replacement

महत्वाच्या बातम्या :

Pune Traffic Changes l पुणेकरांनो, मराठा आरक्षण मोर्चामुळे वाघोली, खराडीमध्ये तुफान गर्दी! असा असेल पुढील मोर्चाचा मार्ग

Test Team Of The Year 2023 l ICC ने 2023 चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ केला जाहीर केला; भारताच्या या खेळाडूंना मिळाले स्थान

Today Horoscope l या राशीसाठी आजचा दिवस महत्वाचा; तडकाफडकी कामे करू नका अन्यथा…

Manoj Jarange Mumbai March l मराठा आरक्षण यात्रा पुण्यात धडकणार; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

WPL 2024 l किक्रेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर