विक्रमांवर विक्रम रचणाऱ्या विराटने केला ‘हा’ नवा विक्रम

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 50 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा दुसरा भारतीय कसोटी कर्णधार बनला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी नाणेफेकीच्यावेळी कोहली मैदानावर उतरताच कोहलीने हा पराक्रम आपल्या नावे केला आहे. 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 49 सामन्यामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळलं होतं. गांगुली या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानी आला आहे. 2008 ते 2014 या काळापर्यंत एम. एस. धोनीने 60 सामन्यात कर्णधारपद सांभाळल होत.   

कसोटीमध्ये कर्णधारपदाच अर्धशतक गाठलेला जगातील 14 कर्णधार ठरलेला आहे. कोहलीने 2014 साली भारतीय कसोटी संघाच कर्णधारपद सांभाळल होत. 

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत एमएस धोनीने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी पूर्णपणे विराट कोहलीच्या खांद्यावर आली. 

दरम्यान, पुण्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दुपारर्यंत 198 धावांवर 3 गडी गमवलेेले. मागिल सामन्यात दोन्ही डावात शतक करणााला रोहित शर्मा 14 धावांवर तंबूत परतला.

महत्वाच्या बातम्या-