मुंबई | काल टी-20 विश्वचषक स्पर्धेतला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली शेवटचा सामना पार पडला. या अखेरच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघांनं शेवट गोड केला. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंद पहायला मिळाला. विराटसाठी हा सामना खरंंतर खूप खास ठरला आहे.
विराट कोहलीनं टी-20 स्पर्धा सुरु होण्याच्या आधीच कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सध्या टी-20 सामन्यातून संघ बाहेर पडला असला तरी त्याच्या नेतृत्त्वाखाली शेवट्या सामन्यात 9 विकेट्सनं विजय मिळाला आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत.
टी-20 कर्णधार म्हणून विराट शेवटचा सामना पार पडल्यानंतर आता विराटनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कामाचा भार सांभाळण्याची हीच योग्य वेळ आहे आणि भविष्यात तो त्याच उत्साहाने खेळू शकला नाही, तर तो क्रिकेट खेळणे थांबवेल, असं विराटनं म्हटलं.
भारताचा कर्णधार होणे ही अभिमानाची बाब आहे. कर्णधारपदाची ही चांगली जबाबदारी होती. या विश्वचषकात असतानाही आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करू शकलो, असंही विराट म्हणाला.
पुढे विराट म्हणाला की, आता नवीन खेळाडूंना संधी देण्याची वेळ आहे. संघात अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यात लीडरशीप क्वालिटी आहे. त्यामुळे येणारा कालावधी भारतीय क्रिकेटसाठी नक्कीच चांगला आहे.
कोहलीसोबतच भारतीय टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचीदेखील सोमवारी शेवटची मॅच होती. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपनंतर माजी कॅप्टन आणि क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचे नवे मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहेत.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, विराट कोहलीनंतर भारतीय टी-20 संघाची धुरा कुणाच्या हातात देण्यात येणार याकडे सगळ्यातं लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक
कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”
“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार