“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”

मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली. युती तुटल्यानंतर तीन राजकीय पक्ष अनपेक्षितपणे एकत्र आले आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.

अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले व महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार पडेल असं भाकीत विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

काँग्रेस नेते व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी नुकतंच महाविकास आघाडीवर भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमानंतर विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचं गुपित सांगितलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील असं स्वप्नातही कधी वाटलं नसल्याचं कदम म्हणाले आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामुळे आम्ही सत्तेवर आलो असल्याचा खुलासा देखील विश्वजीत कदम यांनी केला.

संजय राऊत यांच्या अंगात आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलं आहे. तर संजय राऊतांमुळेच आम्ही सत्तेवर आलो, असंही कदम म्हणाले.

आम्हाला निवडून येऊन विरोधी बाकांवर बसावे लागणार होते. मात्र, संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि कधीही एकत्र येणार नाहीत असे तीन पक्ष एकत्र आले, असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलं.

दरम्यान, संजय राऊतांमुळे राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आल्याचं मत विश्वजीत कदम यांनी बोलून दाखवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…

मोठी बातमी! नवाब मलिकांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

राहुल गांधींची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”