मुंबई | सध्या कोरोनाने जगभरात हैदोस घातला आहे. संपुर्ण जगात कोरोनामुळं भीतीचं वातावरण आहे. प्रसिध्द बुद्धिबळपटू, बुध्दिबळ खेळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोना विषाणूमुळं जर्मनीत अडकला आहे. बुद्धिबळ स्पर्धेसाठी तो जर्मनीत गेला होता, परंतु कोरोना विषाणूंमुळं त्याचा तेथील मुक्काम वाढला आहे. सोमवारी तो भारतात येणं अपेक्षित होतं. परंतु या महिना अखेरपर्यंत त्याला भारतात परतता येणार नाही.
50 वर्षीय आनंद फेब्रुवारीत जर्मनीला गेला होता. तो आता जर्मनीत सर्वांपासून वेगळा रहात आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियांशी मित्रांशी संवाद साधत आहे.
माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव आहे. आयुष्यात प्रथमच माझ्या आणि कदाचित अनेकांना स्वतःला सर्वांपासून दूर ठेवावे लागण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रीया आनंदने Times Of Indiaला दिली आहे. दिवसातून एक फोन घरच्यांना करतो. व्हिडीओ कॉल करून मुलगा अखिल आणि पत्नी अरुणा यांच्याशी संवाद साधतो. आम्ही एकमेकांसोबत सकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असतो, असंही तो यावेळी म्हणाला.
आनंद तिथे असल्यानं मला भीती वाटत आहे. त्याची आठवण येत आहे आणि त्याला काळजी घेण्याचे आम्ही सतत सांगतो. महिना अखेरीस तो भारतात येईल अशी आशा आहे. अशी प्रतिक्रीया आनंदच्या पत्नीने माध्यमांशी बोलत असताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील
-“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”
-“शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा”
-कोरोबाबत पुण्यात अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल
“शरद पवारांनी तीन टर्ममध्ये 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या”