भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाची अ‌ॅलर्जी- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली | भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाची अ‌ॅलर्जी आहे. एखाद्या विशिष्ठ धर्माचा अपमान करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ होत नाही, असं मत उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी व्यक्त केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात ते बोलत होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चेन्नई येथील श्री रामकृष्ण मठ याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपली मतं मांडली. भारताने कायमच वेगवेगळ्या देशातील पीडितांना आश्रय दिला आहे, असं ते म्हणाले.

स्वामी विवेकानंदांना आपण हिंदू धर्माचे आहोत याचा अभिमान होता. या धर्मानेच सहनशक्ती आणि सर्वांना स्वीकारण्याची शिकवण दिली. सर्व धर्मांचे अस्तित्व हिंदू धर्म स्वीकारतो, हेच हिंदू धर्माचे मोठेपण आहे, असंही ते म्हणाले आहेत.

स्वामी विवेकानंद एका भाषणात बोलताना म्हणाले होते, इतर देशातील पीडितांना आश्रय देणाऱ्या देशाचा मी नागरिक आहे, हे आपण विसरता कामा नये, असंही उपराष्ट्रपती म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-