‘या’ तारखेला होणार सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान

सातारा :  विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली होती. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा वगळता इतर लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा केल्यामुळे उदयनराजे चिंतेत होते.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –