भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर ‘वाडा’ची बंदीची कारवाई!

नवी दिल्ली : वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा) ने भारताला मोठा दणका दिला आहे. भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीला सहा महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. वाडाने म्हटलं आहे की, एनडीटीएल लॅबकडून आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी न केल्यानं हे पाऊल उचललं आहे. टोक्यो ऑलिम्पिकला एक वर्षापेक्षाही कमी काळ उरला असताना वाडाच्या या निर्णयानं भारताच्या उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधाच्या मोहिमेला धक्का बसणार आहे.

वाडाने नवी दिल्लीतील एनडीटीएलवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. याअतंर्गत एनडीटीएल कोणत्याही प्रकारची उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी करू शकत नाही. त्यांना रक्त, लघवी तपासणीसुद्धा करता येणार नाही, अशी माहिती वाडाकडून देण्यात आली आहे. 

आतापर्यंत ज्या नमुन्यांची चाचणी बाकी आहे ते नमुने वाडाकडून मान्यता असलेल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येतील. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी खेळाडूंचे रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेऊ शकते मात्र त्यांना भारताबाहेर वाडाच्या मान्यताप्राप्त लॅबमध्ये चाचणी करावी लागेल.

त्यांच्या एका पथकानं एनडीटीएलला भेट दिली होती. त्यावेळी लॅबने आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष पूर्ण केले नसल्याचं आढळून आलं. वाडानं याची माहिती संकेतस्थळावर दिली असल्याचं वाडाने स्पष्ट केलं आहे. 

नडीटीएल या निलंबनाविरुद्ध लुसानेत असलेल्या कोर्ट ऑफ आर्बिटेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये 21 दिवसांत अपील करू शकते. जर भारतानं आपली बाजू भक्कमपणे मांडली तर हे निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बालाकोट हवाई हल्ल्याचा थरार पडद्यावर दिसणार!

-अमिताभ बच्चन यांचा दिलदारपणा; वयानं लहान असणाऱ्या ‘या’ स्पर्धकाच्या पडले पाया

-गेल्या 70 वर्षातली अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट स्थिती; निती आयोगाने दिली कबुली

-“नरेंद्र मोदींना सारखं-सारखं खलनायक ठरवणं चुकीचं”

-स्टेशनवर भिक मागणाऱ्या महिलेचं पहिलं गाणं हिमेशसोबत झालं रेकॉर्ड