विरुष्कासह वामिकाचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेञी आहे. हे दोघं कायम सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहायला मिळतात.

अभिनेञी अनुष्का शर्माने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. आई झाल्यापासून अनुष्का आपला वेळ वामिकाला देताना दिसतीये. तसेच त्या दोघांनी त्यांच्या लेकीला सोशल मीडियावर दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराट आणि अनुष्काने वामिकाला सोशल मीडियावर लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबरचं ते वामिकासाठी एक चांगले पालक बनण्याचा पुर्णपणे प्रयत्न करत आहेत.

सध्या विरुष्काचे बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेञी अनुष्का शर्माने आणि विराट कोहली यांना एअरपार्टवर लेकीसोबत स्पाॅट केल. विरुष्का लेक वामिकासोबत पहिल्यांदा एकञ दिसले.

या फोटोमध्ये अनुष्काने वामिकाला उचलून घेतल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे विराट आपले कर्तव्य बजावताना दिसतोय. फोटोमध्ये विराट कोहलीने सर्व बॅग्ज् हातात घेतल्या असून त्या सांभाळत आहे. या पावर कपलचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला. तसेच या फोटोमुळे विरुष्काचं कौतुकही होतय.

अहमदाबादवरून पुण्याला परतत असताना अनुष्का आणि विराटला लेकीसोबत स्पॉट करण्यात आलं. एअरपोर्टवर काढलेले हे फोटो मीडियावर खूपच व्हायरल झाले. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी आणि अजून काही फोटोग्राफर्सने विराटच्या कुटुंबाचे फोटो त्यांच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

एअरपोर्टवरील फोटोमध्ये अभिनेञी अनुष्का शर्माने वामिकाला घट्ट् कवटाळून पकडलं आहे. त्यामुळे दोघांनी ठरवल्याप्रमाणे वामिकाचा चेहरा कोणत्याच फोटोमध्ये दिसत नाहीये. विराट सामान सांभाळताना दिसत असल्यानं, एक उत्तम वडिल असल्याचं नेटकऱ्यांकडून म्हटलं जातयं. तसेच दोघही चांगलं पालकत्व करत असल्याचं म्हटलं जातयं.

तसेचं, 12 जानेवारीला विरुष्काच्या घरी वामिकाचं आगमन झालं. दोन महिने पूर्ण झाल्यावर दोघांनी तिचा वाढदिवस पण साजरा केला. दरम्यान, नुकताच विरुष्काने एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये त्यांच्या घरावरील दाराच्या पट्टीवर त्यांनी वामिकाच्या नावाचा  समावेश केल्याचं सांगितलं होत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…

आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…

सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…