मुंबई : खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य लोक एकीकडे मिळेल त्या माध्यमातून वेदना मांडत असतात. त्यात आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही सुरात सूर मिसळला आहे. गेल्या काही दिवसांत अभिनेते प्रशांत दामले, प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, सुबोध भावे यांच्यासह अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेही आवाज उठवला आहे.
ठाण्यातील एका नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी पुष्करने मेट्रो आणि रेल्वेचा पर्याय स्वीकारला आहे. त्याचसोबत मेट्रो तर हवी पण आरेतील झाडांच्या किंमतीवर नको, असं ठाम मत त्याने ट्विटरवर मांडलं आहे.
आरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील, आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरेच्या सद्य स्थितीतल्या जंगलासह मेट्रो हवी, अशी मागणी पुष्करने केली आहे.
मुंबईतील इतर भागांत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोरील रस्ता कसा गुळगुळीत आहे, असा सवाल पुष्करने केला आहे. गाडी आणि रस्त्याच्या नादाला लागायचंच नाही असाही निर्णय पुष्करने घेतला आहे.
दरम्यान, पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला त्याला सव्वा तीन तास लागले. सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचे त्याने एका व्हिडीओद्वारे सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला- प्रकाश आंबेडकर – https://t.co/pPWKu19E4m @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
कॉंग्रेसला मोठा धक्का, या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा – https://t.co/YDcnCbZ09o @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
“तिकीट देत असाल पक्षात थांबतो नाही तर पक्ष सोडतो”https://t.co/D6e3s4LoD8
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019