Top news आरोग्य कोरोना

कोरोनाचा सामना करायचाय?; ‘या’ तीन गोष्टीचा करा आहारात समावेश!

मुंबई |  कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. काही देशांमध्ये तर कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक पुरेपूर काळजी घेत आहेत. तसेच लोक कोरोना काढ्याचं सेवन देखील करत आहेत. या महामारीच्या काळात लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे भर देत आहेत.

जगातील अनेक शास्त्रज्ञ गेल्या कित्येक महिन्यांपासून या महामारीवर संशोधन करत आहेत. कोरोना लशीवरील संशोधनाबरोबरच शास्त्रज्ञ कोरोनाला कसं रोखलं जावू शकतं? यावर देखील संशोधन करत आहेत. अशातच आता कोरोनाला रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी महत्वपूर्ण उपाय सांगितला आहे.

शास्त्रज्ञांच्या मते कोरोनाशी लढण्यासाठी ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्ष्य या गोष्टी बळ देवू शकतात. ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्ष्यामधील केमिकल्स कोरोना एंझाइम ब्लॉक करते, ज्याच्यापासून कोरोना पसरतो.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार प्रोटीझ एंझाइमच्या मदतीने कोरोना पसरतो. हेच द्रव्य आपण शरीरात पसरणं थांबवलं तर कोरोनाचा धोका कमी होतो. ग्रीन टी, चॉकलेट आणि द्राक्ष्यामधील केमिकल्स हेच काम करतात.

दरम्यान, मोदी सरकारने आज कोरोना लसीवर महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारकडून सर्वांचंच लशीकरण मोफत होणार नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

फक्त प्राथमिक गटातील लोकांना आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे किंवा ज्यांची कोरोना रुग्ण म्हणून नोंद आहे, अशाच लोकांना लस मोफत देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र, इतर देशाच्या तुलनेत भरतातील कोरोना लस स्वस्त असेल, असं देखील आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना लशीचे वितरण आणि किंमत याबाबत महत्वपूर्ण बैठक घेतली आहे.

तज्ञांकडून कोरोना लशीला मंजुरी मिळताच कोरोना लशीकरण कार्यक्रम सुरु केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोरोना लशीची किंमत किती असेल याबाबत राज्यांशी विचारविनिमय करून किंमत ठरवली जाईल, असं देखील मोदींनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना लशीबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा! पहा कोणाला मिळणार विनामूल्य लस?

‘या’ भाजप नेत्याने आता तर हद्दच पार केली! ममता बॅनर्जींना शिवी देत म्हणाले…

शेतकऱ्यांपुढे मोदी सरकार नमलं; आंदोलकांना दिली ‘ही’ परवानगी!

गाडी घ्यायचा विचार करताय?; भारताच्या ‘या’ सर्वात सुरक्षित गाड्या नक्की पाहा!

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल