मुंबई | इंस्टंट मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा जवळपास आज सर्रास वापर केला जातो. अनेकजण हा मेसेजिंग अॅप वापरतात. अलीकडे कंपनीने या अॅपमध्ये अनेक फिचर्स दिले आहेत. तसेच कंपनीने अलीकडे ‘डिलीट फॉर एव्हरीव’ हे फिचर देखील व्हॉट्सअॅपमध्ये दिले आहे.
या फिचरमुळे युजर एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतो. कोणता तरी मेसेज समोरच्या व्यक्तीने डिलीट केला आहे? हे रिसिव्हरला कळते. पण नेमका तो मेसेज कोणता होता? हे त्याला समजू शकत नाही. यामुळे अनेकांना हे फिचर नको वाटते.
व्हॉट्सअॅपमध्ये असं कोणतंही फिचर नाही ज्यामुळे डिलीट केलेले मेसेज समोरच्याला समजू शकतील. पण आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला समोरच्याने नेमका कोणता मेसेज डिलीट केला आहे?, हे समजू शकेल.
परंतु ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इंस्टॉल करावा लागेल. तसेच इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, व्हॉट्सअॅप अशा कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला प्रमोट करत नाही.
व्हॉट्सअॅपवरील डिलीट मेसेज पुन्हा वापरण्यासाठी पुढील ट्रिक वापरा
1. व्हॉट्सअॅपवरील डिलीट मेसेज वाचण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ‘व्हॉट्स रिमूव्हड प्लस’ हा अॅप डाऊनलोड करावा लागेल.
2. व्हॉट्स रिमूव्हड प्लस हा अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला काही टर्म्स आणि कंडीशन्स दाखवल्या जातील. त्या काळजीपूर्वक वाचून अॅक्सेप्ट करा
3. तसेच तुम्हाला यासाठी तुमच्या मोबाईल नोटीफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल.
4. यानंतर तुम्ही ते अॅप्स निवडू शकता ज्याचे नोटीफिकेशन तुम्हाला पहायचे आहेत.
5. पुढे व्हॉट्सअॅप मेसेज अनेबल करून कंटीन्यू बटनावर क्लिक करा. तुम्हाला फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे नोटीफिकेशन हवे असल्यास तुम्ही ते देखील निवडू शकता.
6. आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला सर्व डिलीटेड मेसेज दिसतील.
महत्त्वाच्या बातम्या-
लेकीने करीनाला ‘आँटी’ म्हणताच संतापलेला सैफ साराला म्हणाला…
महिंद्रा कंपनी लवकरंच बंद करणार नुकतीच लॉंच केलेली ‘6 सीटर SUV थार’? वाचा सविस्तर
कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ
दुःखद बातमी! भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचं नि.धन, राजकीय क्षेत्रात हळहळ