पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर

मुंबई | गेल्यावर्षाभरापासून एकीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानाने नको-नकोस केलं आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक पीकांचे नुकसान होतं.

आताकुठे कडाडीचा उन्हाळा जाणवायला लागला असताना, अशातच पुन्हा पाऊस डोकं वर काढायला सुरुवात करत आहे. राज्यात पुढील काही दिवसामध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तापमान वाढल्यामुळे काही ठिकाणी तापमानात अचानक घट झाली आहे.

कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठावाडा या भागांमध्येही तापमानत घट झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

याच दरम्यान हवामान खात्याने पुढील चार भागात राज्यातील विविध जिल्ह्यात विजांचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामाखात्याने वर्तवल्या अंदाजानूसार

8 एप्रिल

कोकण- तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रा- कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा- या ठिकाणीही हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ- हवामान कोरोडे रहाण्याची शक्यता.

9 एप्रिल

कोकण-तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्र- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्रात काही भागात पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भ- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

10 एप्रिल

कोकण-तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा- तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता

विदर्भ- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही भागात ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

11 एप्रिल

कोकण- काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र- दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांचसह कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ-तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

12 एप्रिल

चंद्रपूर- एक- दोन ठिकाणी विजांसह कडाडीसह पाऊस पडण्याची शक्यता.

गडचिरोली- गडचिरोलीमध्येही एक-दोन ठिकाणी विजांसह कडाडीसह पाऊस पडण्याची शक्यता.

महत्वाच्या बातम्या-

‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट…

‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’ म्हणत…

लग्नात नवरी निघाली नवदेवाची हरवलेली बहीण, पाहा नेमकं काय…

कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं…

राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy