Top news महाराष्ट्र मुंबई

पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Rain mumbai e1623211596153 1
Photo Courtesy - Twitter/ ANI Video Screenshot

मुंबई | आजपासून पुढच्या एका आठवड्यापर्यंत अनेक भागात उष्णतेच्या लाटेपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. आजपासून 24 मे पर्यंत, दिल्ली-एनसीआरमध्ये काही प्रमाणात प्री-मॉन्सून पाऊस पडू शकतो.

आजपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आज पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने सांगितलंय.

येत्या 5 दिवसांत पश्चिम हिमालयीन भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

काही भागात वादळी वारे आणि पाऊस पडल्याने उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

IMD ने शहराच्या दूरवरच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने 23 आणि 24 मे रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्र सरकार पाठोपाठ ठाकरे सरकारनेही घेतला मोठा निर्णय! 

‘तू कोण आहेस, गांधी की वल्लभभाई?’; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही” 

“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….”