Top news मनोरंजन

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

नवी दिल्ली | नुकतेच दोन दिवसांपूर्वी ३ ऑक्टोबरपासून बिग बॉसचे १४ वे पर्व चालू झाले आहे. या पर्वात बिग बॉसमध्ये कोण स्पर्धक येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच राधे माँ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

हा पर्व सुरू होऊन केवळ एक-दोन दिवसच झाले आहे. पण त्यातही बिग बॉसच्या घरात लगेचच भांडणाला सुरवात झाली आहे. एवढंच नाही तर स्पर्धकांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही गोष्टीही यातून समोर आल्या आहे.

समोर आलेल्या गोष्टीतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. यात पहिला क्रमांक पवित्रा पुनिया हिचा लागतो, कारण तिने सर्वात प्रथम घरात प्रवेश केला आहे. पवित्रा पुनिया हिने बिग बॉसच्या १३ व्या पर्वातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या १३ व्या पर्वातील पारस छाबडा याला पवित्रा हिने डेट केल होतं. आता पारस छाबडा आणि पवित्रा पुनिया यांच्याशी निगडित सर्व गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या आहे. या सर्व गोष्टी खुद्द पारस आणि पवित्रा सांगत आहे.

पवित्रा पुनिया म्हणाली की मी पारस छाबडा याला डेट केलं, ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चुकी आहे. याचे उत्तर देताना पारस छाबडा म्हणाला की, पवित्रा मला डेट करत होती तेव्हा मला समजले की तिचे लग्न झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पतीने मला मेसेज केला होता.

पुढे बोलताना पारस म्हणाला, पवित्रा हिच्या पती मला मेसेज करून म्हणाले. तुम्ही दोघांनी एक होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पवित्रासोबत माझा घटस्फोट झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यातच दुसऱ्या बाजूला एका मुलाखतीत बोलताना पवित्रा हिने पारसवर अनेक आरोप केले आहे.

बिग बॉसमध्ये घरात येण्याचा सल्ला पारस याने मला दिला होता. आता जर पारस यांच्यात थोडासाही आत्मसन्मान उरला असेल तर त्यांनी या पर्वात सहभागी होऊ नये. पवित्रा पुनिया या एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या, मी माझ्या वास्तविक जीवनात एक चुकी केली आहे.

पारस यांच्यात थोडासा सन्मान आणि समज बाकी असेल तर त्यांनी मी असताना बिग बॉसच्या १४ व्या पर्वात प्रवेश करू नये आणि जर प्रवेश केला तरी त्यांनी मला त्रास देऊ नये. अन्यथा त्यांना गंभीर परिस्थितींचा सामना करावा लागेल, असं पवित्रा म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…

गंदी बात वेबसीरिजच्या पाचव्या भागाचा इन्टिमेंट सीन शुट करतानाचा व्हिडीओ व्हायरल