खेळ

पुढच्या वर्ल्डकपला कर्णधार म्हणून विराट नको रोहित पाहिजे… या खेळाडूने केली मागणी

मुंबई |  विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला बुधवारी झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. अन् करोडो फॅन्सचा हिरमोड झाला. काही भारतीय पाठीराखे संघाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले तर काही पाठीराख्यांनी कर्णधाराच्या आणि खेळाडूंच्या चुकांवर बोट ठेवलं.

मर्यादित षटकांच्या सामन्यात विराट कोहलीचे नेतृत्व अनेकदा चर्चेत असते. बहुतेक वेळा तो कॅप्टन कुल धोनीवर अवलंबून असल्याचं दिसून येतो. यातच सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवून कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासनान लोकांच्या निशाण्यावर आहे.

अशातच पुढच्या विश्वचषकात विराट कोहलीला हटवून भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कर्णधारपदाची संधी द्या, अशी मागणी भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर याने केली आहे.

वसिम जाफर याने ट्वीट करत मर्यादित फटकांच्या सामन्यासाठी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपविण्याची वेळ आली आहे का? त्याला 2023 च्या वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना मला पाहायला आवडेल, असं म्हटलंय.

टीम इंडिया कर्णधार विराट कोहली आणि आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एकतर्फी कारभारामुळे भारतीय संघात असंतोष परसल्याची चर्चा आहे.  रवी शास्त्री आणि विराट कोहली कोणालाही न विचारता परस्पर निर्णय घेतात. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दोन गट पडले असल्याचं बोललं जातंय.

 दरम्यान, परदेशातून भारतीय संघ परतल्यानंतर बीसीसीआय प्रशासन बैठक घेऊन विश्वचषकाच्या कामगिरीबाबत जाब विचारणार आहे.

IMPIMP